`जरा मध्यमवर्गीयांना दिलासा द्या,` तरुणाचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे गाऱ्हाणं, त्या म्हणाल्या, `तुमच्या...`
महागाई वाढत असल्याने मध्यमवर्गीयांची चिंता वाढत असतानाच एका व्यक्तीने एक्सवर पोस्ट शेअर करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना विनंती केली आहे.
महागाई वाढत असल्याने मध्यमवर्गीयांची चिंता वाढत असून, खिशावर अधिक भार पडण्याची भीती सतावत आहे. यादरम्यान एका नेटकऱ्याने एक्सवर पोस्ट शेअर करत मध्यवर्गीयांना दिलासा द्यावा अशी विनंती केली आहे. यानंतकर निर्मला सीतारमण यांनीही त्याच्या पोस्टला उत्तर दिलं आहे. अर्थमंत्र्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टवर व्यक्त होताना मध्यमवर्गीय व्यक्तीने ही विनंती केली आहे. निर्माला सीतारमण यांनी यावर उत्र देताना तुम्ही दिलेल्या माहिती महत्त्वाची असून, हे सरकार लोकांचा आवज ऐकतं असं सांगितलं आहे.
तुषाऱ शर्मा नावाच्या व्यक्तीने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने लिहिलं आहे की, "सरकारसमोर असलेली आव्हानं समजू शकतो, पण मध्यवर्गीयांना दिलासा देण्यासंबंधी काही तरी विचार केला जावा अशी माझी मनापासून विनंती आहे".
"आम्ही तुमच्या प्रयत्नांची आणि देशासाठी केलेल्या योगदानाची मनापासून प्रशंसा करतो. आम्हाला तुमचं कौतुक आहे. मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की मध्यमवर्गीयांना काही दिलासा देण्याचा विचार करा. मला प्रचंड आव्हानांची कल्पना आहे. ही माझी मनापासून विनंती आहे," असं तुषार शर्मा यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
सीतारमण यांनी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्यांनी 'द संडे गार्डियन'मध्ये प्रकाशित त्रावणकोरच्या पूर्वीच्या रॉयल फॅमिलीच्या सदस्याने रचलेले श्लोक शेअर केले होते. त्यावर तुषार शर्मा यांनी ही पोस्ट टाकली होती. यावर उत्तर देताना निर्मला सीतारमण यांनी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आभार सांगत, सरकार याची दखल घेत असल्याचं म्हटलं आहे.
"तुमच्या चांगल्या शब्दांबद्दल आणि समजुतीबद्दल धन्यवाद. आम्ही तुमच्या चिंता ओळखतो आणि त्या समजून घेतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हे एक प्रतिसाद देणारं सरकार आहे. जे लोकांचा आवाज ऐकते आणि त्याकडे लक्ष देते. तुम्ही आम्हाला समजून घेतल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. तुमची माहिती महत्त्वाची आहे," असं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.
भारतीय मध्यमवर्गीयांसाठी मोठी चिंतेची बाब बनलेल्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही विनंती करण्यात आली आहे. देशातील किरकोळ चलनवाढीचा दर गेल्या महिन्यात 6.21% नोंदवला गेला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार खाद्यपदार्थांची चलनवाढ सप्टेंबरमध्ये 9.24 टक्क्यांवरून गेल्या महिन्यात 10.87 टक्के होती.