संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतला मोठा निर्णय
निर्मला सीतारमण यांनी देशाच्या संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला आहे. पदभार स्विकारताच निर्मला सीतारमण यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : निर्मला सीतारमण यांनी देशाच्या संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला आहे. पदभार स्विकारताच निर्मला सीतारमण यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
निर्मला सीतारमण यांनी देशाच्या माजी सैनिकांच्या बाबतीत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माजी सैनिकांना आर्थिक मदतीसाठी निर्मला सीतारमण यांनी मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे माजी सैनिकांना मोठा फायदा होणार आहे.
निर्मला सीतारमण यांनी आरएमडब्ल्यूएफला आर्थिक मदत देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा फायदा ८६८५ माजी सैनिकांना, विधवांना होणार आहे. संरक्षण मंत्र्यांनी आर्म्ड फोर्सेज फ्लॅग डे फंडनुसार १३ कोटी रुपयांचं अनुदान घोषित केलं आहे. याची माहिती स्वत: निर्मला सीतारमण यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
संरक्षण मंत्र्यांचा पदभार स्विकारल्यानंतर रक्षामंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं की, भारत हा रक्षा सामग्री साहित्य खरेदी करणारा एक मोठा देश आहे. मात्र, आता भारतात मोठ्या प्रमाणात अनेक उत्पादन तयार केली जात आहेत. तसेच, देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांच्या आणि त्यांच्या परिवाराचा सांभाळ करणं ही आमची जबाबदारी आहे.