Nithin Kamath Net Worth: अलिकडच्या काही वर्षांमध्ये भारतीय उद्योजकांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामध्ये नितीन कामथ यांच्यासह अनेक मोठ-मोठ्या उद्योजकांचा समावेश आहे. अशातच आता नितीथ कामथ हे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. कोण आहेत नितीन कामथ आणि त्यांची नेटवर्थ किती? जाणून घ्या सविस्तर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण आहेत नितीन कामथ? 


नितीन कामथ यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1979 रोजी कर्नाटकातील शिमोगा येथे झाला आहे. त्यांचे वडील हे कॅनरा बँकेत एक्झिक्युटिव्ह होते. 1996 मध्ये त्यांनी बंगलोर येथे स्थायिक होण्यापूर्वी भारतभर प्रवास केला. जिथे त्यांनी त्यांचे माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 17 व्या वर्षी स्टॉक मार्केटमध्ये व्यापार करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी काही दिवसांनंतर कॉल सेंटरमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावासोबत 2010 मध्ये झिरोधाची स्थापना केली. 


नितीन कामथ यांची नेटवर्थ 


मार्च 2022 ला झिरोधाचा महसूल 82 टक्क्यांनी वाढला. तसेच या कालावधीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 87 टक्क्यांनी वाढ झाली. परिणामी झिरोधाचे सह-संस्थापक नितीन कामत आणि निखिल कामत यांनी अधिकृतपणे 2023 च्या फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. नितीन कामथ भारतातील 1104 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.


नितीन यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत त्यांच्या झिरोधा कंपनीच्या भांडवलातून आहे. फोर्ब्स इंडियाच्या मते नितीन कामथ यांची एकूण संपत्ती 2023 पर्यंत 2.7 अब्ज डॉलर असल्याचा अंदाज आहे. तर 2025 मध्ये नितीन कामथ यांची नेटवर्थ 460 कोटी अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 39432 कोटी 09 लाख 30 हजार रुपये इतकी नेटवर्थ आहे. 



 
अंबानींशी स्पर्धा


झिरोधाने AMC व्यवसायासाठी संपत्ती व्यवस्थापन कंपनी Smallcase सोबत हातमिळवणी केलीये. या व्यवसायात भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्याशी स्पर्धा केली आहे. मुकेश अंबानी यांची कंपनी Jio Financial Services ने जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी 
BlackRock सोबत हातमिळवणी केली आहे.