Nitin Gadkari : छोट्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी. छोट्या गुंतवणूकदारांसाठी केंद्र सरकार देशभरात रस्त्यांच्या निर्मितीसंदर्भातील योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल असं नवं मॉडेल आणणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'गुंतवणूकीचं नवीन मॉडेल हे छोट्या गुंतवणूकदारांना, लघू आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकीसाठी लागणाऱ्या भांडवल निर्मितीसाठी पुढच्या महिन्यापासून संपर्क केला जाईल.' असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितलं.


नेमकं काय म्हणाले केंद्रीय मंत्री?



छोट्या गुंतवणूकदारांसाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देणारं नवं मॉडेल बनवत आहोत. लवकरच या इनविट्सला शेअर बाजारात सुचिबद्ध करणार आहोत, जेणेकरुन रिटेल इ्नवेस्टर यामध्ये गुंतवणूक करु शकतील, असं ते म्हणाले.  


गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसह सर्वसामान्यांना पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देत असल्याचं सांगत त्यांनी 7 ते 8 टक्क्यांपर्यंत मासिक रिटर्नचं आश्वासनही दिलं.


छोट्या गुंतवणूकदारांना होणार मोठा फायदा



'रिटेल इनवेस्टर्ससाठी या मॉडेलमध्ये गुंतवणूकीची मर्यादा 10 लाख रुपये असणार आहे, त्यासोबतच गुंतवणूकीवर 7 ते 8 टक्क्यांचा सुनिश्चित रिटर्न मिळेल. सुरुवातीच्या काळात रस्त्यांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूकीची संधी दिली जाईल', ही बाब त्यांनी स्पष्ट केली.


सरकारच्या या मॉडेलमुळे छोट्या गुंतवणूकदारांना आणि मध्यमवर्गीयांना मोठा फायदा होणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे, बँकेने खात्यातील जमा रक्कमेवरचं व्याज कमी केलं आहे आणि ही सेवानिवृत्त लोकांसाठी मोठी समस्या ठरेल, असंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.


वाचा... प्रवास करतानाच बँक खात्यातून कापले जाणार पैसे, Highway नं जाताय? ही बातमी तुमच्यासाठी