नवी दिल्ली : देशातले शंभर पूल धोकादायक असल्याचं रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी लोकसभेत सांगितलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१०० पूल कोसळण्याच्या मार्गावर आहेत, त्यांची ताबडतोब दुरुस्ती करण्याची गरज असल्याचं गडकरींनी म्हटलंय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं नुकतंच देशातल्या १ लाख ६० हजार पूलांचं ऑडिट केलं. त्यात १०० पूल धोकादायक असल्याचं समोर आलंय. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला गडकरींनी ही माहिती दिली. 


यावेळी सावित्रीवरच्या दुर्घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. भूसंपादन, अतिक्रमण आणि पर्यावरणा संदर्भातल्या मुद्द्यांमुळे पावणे चार लाख कोटींची पूल बांधणी रखडल्याचंही गडकरींनी सांगितलं.