नवी दिल्ली : ‘नोटाबंदीचे चांगले परिणाम अर्थव्यवस्थेत दिसत आहेत. अनेक बोगस कंपन्यांचे व्यवहार उघड झाले. भविष्यात अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल’, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.


‘डिजिटल व्यवहार नोटाबंदीमुळे ५८ टक्क्यांनी वाढले आहेत. नोटाबंदीमुळे डिजिटल देवाण-घेवाणीत वाढ झाली. काळा पैसा असल्याच्या संशयावरून सध्या चौकशी सुरू आहे. व्याजदर कमी झाल्याने सामान्य जनतेला फायदा झालाय. बॅंकेत मोठ्या प्रमाणात काळापैसा जमा झालाय’, असे ते म्हणाले.


ते पुढे म्हणाले की, ‘नोटाबंदीमुळे काळा पैसा वापरणारे नाराज झाले आहेत. नोटाबंदी चांगले परिणाम अर्थव्यवस्थेत दिसताहेत. बोगस कंपन्यांचे व्यवहार उघड झाले. भविष्यात अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल. नोटाबंदीनंतर १.३८ लोकांनी ५ लाख कोटी रुपये जमा केलेत. नोटाबंदीमुळे काही लोकांना त्रास झाला परंतु अर्थव्यवस्था मजबूत झाली. नोटाबंदीमुळे ९० टक्के काळा पैसा बाहेर आला. ३ लाख ६८ लाख बँक खात्यातील व्यवहार संशयास्पद आहेत’.