बसमध्ये फ्लाइटप्रमाणे टीव्ही, चहा-नाश्ता आणि बस हॉस्टेस`; भाडे फक्त `इतके`; गडकरींचा मास्टरप्लान
Nitin Gadkari: येणाऱ्या काळात सार्वजनिक वाहतूक कशी असेल याचा मास्टर प्लान नितीन गडकरींनी सांगितला.
Nitin Gadkari: भारतातील रस्ते, रेल्वे वाहतुकीत गेल्या काही वर्षात महत्वाचे बदल पाहायला मिळत आहेत. सार्वजनिक वाहतूक अधिक वेगवान आणि विविध सुविधांनी सज्ज असलेली पाहायला मिळतेय. केद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सार्वजनिक वाहतुकीसंदर्भात अनेक महत्वाच्या निर्णयांची घोषणा करत असतात. नुकताच त्यांनी बस सेवा आरामदायी करण्यासंदर्भातील मास्टर प्लान सांगितला आहे. एका शो दरम्यान ते बोलत होते. सार्वजनिक वाहतुकीला आम्ही प्राधान्य देत आहोत. सार्वजनिक वाहतुकीला आणखी चांगले दिवस यावेत, यासाठी आम्ही एकावेळी अनेक प्रोजक्ट्सवर काम करतोय, असे गडकरी म्हणाले. येणाऱ्या काळात सार्वजनिक वाहतूक कशी असेल याचा मास्टर प्लान त्यांनी यावेळी सांगितला.
काय म्हणाले गडकरी?
सार्वजनिक वाहतूक आमची प्राथमिकता आहे. यासाठी आम्ही 360 रोपपे केबल कार फेनुकुलर रेल्वेच्या प्रपोजलवर काम करतोय. ज्यामध्ये 5 ते 7 प्रोजेक्ट वेगळ्या एक-दोन महिन्यात सुरु केले जाऊ शकतात. पहिला पायलट प्रोजेक्ट आम्ही नागपूरमध्ये सुरु केलाय, ज्याचे काम सध्या सुरु आहे.
बसमध्ये मिळणार या सुविधा
'या महत्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये 18 मीटर लांब इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे, ज्यामध्ये फ्लॅश चार्जिंग सिस्टम आहे. बस थांबेल आणि अवघ्या 20 सेकंदात ती इतकी चार्ज होईल की पुढचे 40 किमीचे अंतर पार करू शकेल, असे गडकरी म्हणाले. या बसमध्ये 50 ते 60 जण नव्हे तर तब्बल 135 जण एकत्र बसू शकतील. या बसमध्ये फ्लाइट प्रमाणेच सुविधा देण्यात येणार असल्याचे गडकरी म्हणाले. या बसमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत गडकरींनी माहिती दिली. 'या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी टीव्ही आणि खाद्यपदार्थांची व्यवस्था असेल. त्यांना चहा-नाश्ताही मिळेल. एवढंच नव्हे तर एअर होस्टेसप्रमाणे सेवा देणाऱ्या बस होस्टेसही असतील. या प्रवासाचे भाडे कोणत्याही डिझेल बसपेक्षा 30 टक्के स्वस्त असेल, असेही ते म्हणाले.
इलेक्ट्रिक हायवे तयार करण्याचे काम सुरू
इलेक्ट्रिक हायवे हे रस्त्यांचे किंवा महामार्गांचे नेटवर्क आहे. हा हायवे इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EVs) डिझाइन करण्यात येत आहे. येथे इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंगपासून इतर पायाभूत सुविधा दिल्या जात आहेत. इलेक्ट्रिक वाहन चालकांना लांब पल्ल्याच्या प्रवासाला अधिक सुखकर व्हावा यासाठी इलेक्ट्रीक महामार्गांवर चार्जिंग सिस्टम आहेत. शहराअंतर्गत असणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीत असे महामार्ग आल्यास इंधनाचा वापर कमी करण्यास आणि वाहनांचे उत्सर्जन कमी करण्याच्या मदत होणार आहे. त्यामुळे सरकार जितक्या लवकर शक्य होईल तितक्या वेगाने इलेक्ट्रिक हायवे विकसित करण्याच्या योजनेवर काम करत आहे
इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्याची योजना
मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, इलेक्ट्रिक हायवेचा विकास आणि इलेक्ट्रिक बसेसची एन्ट्री एकाचवेळी होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतात EV साठी इकोसिस्टमच्या स्थापनेला गती मिळणार आहे. नवीन ई-हायवे चार्जिंगमुळे पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे. ज्यामुळे अधिक लोकांना दैनंदिन प्रवासासाठी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळेल.ईटीच्या वृत्तानुसार, 6 हजार किमीचे विद्युत महामार्ग बनवण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अवलंब वेगवान करणे आणि देशभरात इलेक्ट्रिक बसेसची फ्रिक्वेन्सी सुलभ करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प पुढील सात वर्षांमध्ये सुरू केला जाणार आहे. ई-हायवेमध्येवाहने चार्ज करण्याची सुविधा असेल. ग्रीन एनर्जीवर चालणाऱ्या पायाभूत सुविधा असतील. हा उपक्रम 2030-पीएमस सार्वजनिक वाहतूक सेवा कार्यक्रमाचा भाग असल्याची माहिती देण्यात आली आहे.