जेव्हा Nitin Gadkari आजोबांच्या भूमिकेत असतात, नातवाला गिफ्ट घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची शॉपिंग
नातवाला सप्राईज गिफ्ट घेण्यासाठी गडकरींची शॉपिंग
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) शुक्रवारी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून खरेदी करताना दिसले. नातवासाठी नितीन गडकरी एका खेळण्यांच्या दुकानात (Toy Store) पोहोचले होते. यावेळी नितीन गडकरी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी पाहताना दिसले. खेळण्यांबद्दल माहिती घेत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी तिथे बराच वेळ घालवला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) शुक्रवारी हॅम्लेच्या स्टोअरमध्ये (Hamley's store) पोहोचले होते. नितीन गडकरी आपल्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज गिफ्ट (Gift) खरेदी करण्यासाठी आला होता. त्यांनी या दुकानामध्ये बराच वेळ घालवला आणि वेगवेगळ्या प्रकारची खेळणी पाहिली. यादरम्यान स्टोअर मॅनेजर त्यांना खेळण्यांची खासियत सांगताना दिसले. नितीन गडकरी यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन याचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये नितीन गडकरी खेळण्यांची माहिती घेताना दिसत होते.
दरम्यान, हॅम्ली हा एक ब्रिटिश टॉय ब्रँड आहे, जो भारतात मुकेश अंबानीच्या नेतृत्वातील रिलायन्सद्वारे चालवला जातो. आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करताना, रिलायन्सने अनेक खेळण्यांच्या बाजारपेठांमध्ये आपले वर्चस्व वाढवले आहे. यामध्ये ही ब्रिटीश खेळण्यांची कंपनी हॅम्ली (Hamleys) तसेच घरगुती खेळण्यांचा ब्रँड रोवन यांचा समावेश आहे. हॅम्लीचा सध्या 15 हून अधिक देशांमध्ये व्यवसाय आहे. तसेच त्यांची भारतातील खेळण्यांच्या दुकानांची सर्वात मोठी शृंखला आहे.
या वर्षी जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भाषणात म्हटले होते की, "खेळण्यांच्या निर्यातीत भारतामध्ये पॉवर हाऊस (Powerhouse) बनण्याची क्षमता आहे. भारतीय खेळण्यांच्या उद्योगाने असे यश मिळवले आहे, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही." व्होकल फॉर लोकलचा (Vocal For Local) आवाज आता सर्वत्र ऐकू येत आहे. खेळण्यांचा उद्योग याची साक्ष देत आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले