राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून नितीन गडकरी यांच्या चेहऱ्यावर प्रचंड अभिमान
चित्ररथाचे वर्णन करणारे शब्द जणू सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमून आणखी स्पष्ट कानांवर येत होते
नवी दिल्ली : भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि अनेक मंत्री, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिल्ली देशाचा तिरंगा ध्वज अतिशय मानानं फडकवण्यात आला.
पुढे दरवर्षीप्रमाणं देशाच्या सामर्थ्याचं प्रतीक असणाऱ्या पथसंचलनातून बलशाली भारताची एक झलक साऱ्या देशाला पाहता आली.
इतकंच नव्हे, तर यामागोमाग देशातील काही राज्यांचे चित्ररथही राजपथावर आले. सलामी मंचासमोर प्रत्येक राज्यानं आपल्या परीनं उपस्थितांनसोर आपल्या राज्याची झलक सादर केली.
याचवेळी महाराष्ट्राच्या चित्ररथानं सर्वांचं लक्ष वेधलं. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या चेहऱ्यावर यावेळी प्रचंड आनंद आणि अभिमानाची भावना पाहता आली.
राज्यातील जैवविविधतेचे पैलू या चित्ररथावर साकारण्यात आले होते. विविध वृक्ष, प्राणी, पक्षीही साकारणअयात आले होते.
राज्याच्या चित्ररथाचे वर्णन करणारे शब्द जणू सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमून आणखी स्पष्ट कानांवर येत होते. हे सर्व अर्थातच अंगावर काटा आणणारं होतं.
एका वेगळ्या पद्धतीनं आपलं राज्य साऱ्या देशानं पाहिल्याचा अनुभव घेत नितीन गडकरी यावेळी मोठ्या आनंदात दिसले.