GADKARI ON ELECTRIC HIGHWAY: गेल्या अनेक वर्षांपासून दिवसेंदिवस इंधन (Fuel) दरवाढीमुळे वाहनचालकांची (Driver) कंबर कोलमडली आहे. पेट्रोल आणि डिझेल अगदी सीएनजीचेही (Cng) गेल्या काही महिन्यांमध्ये झपाट्याने दरवाढ (price increase) झाली. त्यानंतर रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांची (Electric vehicle) संख्या वाढलेली दिसतं आहे. इलेक्ट्रिक वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतातून (India) पेट्रोल (Petrol) - डिझेल (Diesel) हद्दपार होण्याची चिन्ह दिसतं आहेत. कारणही तसंच आहे, आता इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल वाढणार आहे. का तर...इलेक्ट्रिक वाहन चार्ज (Charge) करण्याच्या कटकटतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) यांनी सोमवारी मोठी घोषणा केली आहे. भारतात इलेक्ट्रिक हायवे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.(nitin gadkari say road will charge your car at electric highways and petrol diesel Banned nm)



यामुळे आता महामार्गावर (highway) अवजड (Heavy) मालवाहतूक करणारे इलेक्ट्रिक ट्रक (Truck) आणि बस (Bus) यांचं चार्जिंग होऊ शकेल अशी माहिती गडकरांनी दिली. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सौर (solar) आणि पवन ऊर्जा (Wind energy) आधारीत चार्जिंग प्रणाली विकसित करण्यात केंद्र सरकार प्रोत्साहन देतंय. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर ट्रकसारखी अवजड वाहने (Heavy vehicles) आणि बसना न थांबताच चार्जिंग करणं सुलभ होणाराय..