नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कार उत्पादकांना एक खास ईशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदूषणाला आळा घालायचा असेल, तर अपारंपरिक उर्जेचा पर्याय वापरलाच पाहिजे. जर कार उत्पादकांनी पेट्रोल आणि डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करुन कार तयार केल्या नाहीत तर बुलढोझर वापरण्यास मी कमी पडणार नाही असा ईशारा नितीन गडकरी यांनी दिला आहे.


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करताना काही गोष्टी लादाव्या लागल्या तर त्या करण्यात येतील. प्रदूषणाबाबत माझ्या कल्पना आणि धोरणे अगदी स्पष्ट आहेत. आयात कमी करणे आणि प्रदूषणाला आळा घालणे हे सरकारचे निर्विवाद धोरण आहे. देशात चार्जिंग स्टेशन सुरू करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच निर्णय घेणार आहे.



वाहन उत्पादक कंपन्यांनी पारंपरिक इंधनावर चालणार्‍या वाहनांची निर्मिती केल्यास बुलडोझर फिरविण्यास मागेपुढे पाहणार नाही असेही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.