नवी दिल्ली : आपच्या नेत्यांनंतर आता काँग्रेसच्या नेत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माफी मागितली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी नितीन गडकरी यांची माफी मागितली आहे. यानंतर नितीन गडकरी यांनी दिग्विजय सिंह यांच्याविरोधातील अब्रुनुकसानीचा दावा मागे घेतला आहे. दिग्विजय सिंह यांनी गडकरी यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर गडकरींनी दिल्लीच्या पटियाला हाउस कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.


दिग्विजय सिंह यांनी नितीन गडकरी आणि खासदार अजय संचेती यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. 2014 मध्ये अजय संचेती यांच्यासोबत नितीन गडकरींचे व्यावसायिक संबंध असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर नितीन गडकरी यांनी कोर्टात याविरोधात याचिका केली होती. पटियाला हाउस कोर्टात नितीन गडकरी आणि दिग्विजय सिंह यांनी ज्वाईंट एप्लीकेशन करत ही केस संपवली.