पाटणा: पॉर्न साईटसमुळे महिलांवरील अत्याचाराला खतपाणी घातले जाते. त्यामुळे केंद्र सरकारने यावर बंदी घालावी, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली. महिलांवरील अत्याचाराचे व्हीडिओ पॉर्न साईटसवर अपलोड केले जातात. देशातील तरुणांवर याचा नकारात्मक प्रभाव पडत आहे. त्यामुळे संपूर्ण देशात पॉर्न साईटसवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करणार असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादमधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील बक्सर आणि समस्तीपूरमध्येही अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नितीश यांनी हे भाष्य केले. सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाचे फायदे असले तरी त्याच्या वाईट परिणामांबद्दल मी नेहमीच चिंता व्यक्त केल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले. 



गेल्यावर्षी केंद्र सरकारने Pornhub सह ८५७ पॉर्न साइट्सवर बंदी घातली होती. सरकारचा हा निर्णय अनेकांना रुचला नव्हता. त्यामुळे वापरकर्त्यांनी यावर व्हीपीएनचा (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) तोडगा काढला होता. त्यामुळे व्हीपीएनद्वारे पॉर्न वेबसाइट्स अ‍ॅक्सेस करणाऱ्यांच्या प्रमाणात तब्बल ४०० टक्क्यांची वाढ झाली होती.