नितीश कुमार यांनी केली २१ नेत्यांची हकालपट्टी
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत भाजपशी घरोबा करत सत्ता स्थापन केली. मात्र, नितीश यांचा निर्णय अनेकांना रुचला नाही. ज्यांनी विरोध केला त्यांना थेट पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आलाय. यात २१ नेत्यांचा समावेश आहे.
पाटणा : नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत भाजपशी घरोबा करत सत्ता स्थापन केली. मात्र, नितीश यांचा निर्णय अनेकांना रुचला नाही. ज्यांनी विरोध केला त्यांना थेट पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आलाय. यात २१ नेत्यांचा समावेश आहे.
दरम्यान, जदयूने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन या २१ नेत्यांची हकालपट्टी केलेय, हे विशेष. नितीश कुमारांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय जदयूच्या अनेक नेत्यांना पटलेला नाही. जदयूचे प्रमुख नेते शरद यादव यांना अखेर शनिवारी राज्यसभेच्या नेतपदावरुन हटवण्यात आले. दरम्यान, राज्यसभेतील जदयूचे भाजप खासदार अली अन्वर यांना सुद्धा हा निर्णय पटलेला नाही.
गुजरात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्या विजयानंतर शरद यादव यांनी ट्विटवरुन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत जदयूने भाजप साथ दिली होती. तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. शरद यादव यांनी शुभेच्छा दिल्याने पक्षाला हे रुचलेले नाही. त्यामुळे त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आले.
दुसरीकडे जेडीयूचे संसदीय नेते शरद यादव यांनी म्हटलंय, काही नेते मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी इंदिरा गांधींचाही न घाबरता सामना केला आहे. मग मला घाबरवणारे हे कोण ?
दरम्यान, नितीश कुमार यांच्या निर्णयाविरोधात आपली नाराजी आणि विरोध लोकांसमोर मांडण्यासाठी शरद यादव यांनी राज्यात संवाद यात्रा काढली आहे. लोकांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.