पटना : बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होण्याच्या दिशेने बैठका सुरु आहेत. आज भाजप कार्यालयात सर्व नवनिर्वाचित आमदार आणि भाजपचे विधानपरिषदेच्या आमदारांची बैठक सुरु झाली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित आहेत. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर भाजपची बैठक होईल. या अगोदर राजनाथ सिंह सीएम नितीशकुमारांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. उद्या एनडीए सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजनाथ सिंह यांच्या देखरेखीखाली बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन केले जाईल. एनडीएच्या बैठकीत नितीशकुमार यांना नेता निवडल्याची औपचारिक घोषणा निश्चित मानली जात आहे. त्यानंतर एनडीए नवीन सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपाल फागु चौहान यांना निवेदन देईल. आज नव्या सरकारच्या शपथविधीची तारीखही निश्चित केली जाऊ शकते.


राजभवनमध्ये बिहार सरकारचा शरथविधी आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.