`एटीएम` निगडीत बदललेले नियम जाणून घ्या...
कर्मचाऱ्यांचं आधार व्हेरिफिकेशन करणंही गरजेचं
मुंबई : तुम्ही 'एटीएम' वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सरकारकडून एटीएम संबंधित काही नियम जाहीर केले आहेत. यानुसार, शहरी भागांत रात्री ९ वाजल्यानंतर कोणत्याही एटीएममध्ये कॅश भरली जाणार नाही. तसंच एका कॅश व्हॅनच्या एका सिंगल ट्रिपमध्ये ५ करोड रुपयांहून अधिक कॅश ट्रान्सफर केली जाऊ नये, असंही सांगण्यात आलंय. यानुसार, समाज कंटकांकडून या गाड्यांवर हल्ला करणं, या गाड्यांचा पाठलाग करणं आणि इतर गुन्हेगारी घटनांना तोंड देण्यासाठी कॅश व्हॅनवर तैनात कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे.
गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमांमध्ये कर्मचाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्याचेही आदेश देण्यात आलेत. तसंच कर्मचाऱ्यांचं आधार व्हेरिफिकेशन करणंही गरजेचं आहे.
ग्रामीण क्षेत्रांत सायंकाळी ६ वाजल्यानंतर कोणत्याही एटीएममध्ये कॅश भरली जाणार नाही. सर्व कॅश व्हॅनमध्ये जीएसएम बेस्ड ऑटो-डायलरसोबत सिक्युरिटी अलार्म आणि मोटराइज्ड सायरन लावण्यात येतील. तसंच या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही, लाईव्ह जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम आणि हत्यारासहीत कमीत कमी दोन सिक्युरिटी गार्ड तैनात केले जातील.
सिक्युरिटी गार्डच्या बंदुकांमधून दोन वर्षांत कमीत कमी एकदा टेस्ट फायरिंग केली जाईल आणि त्यातली बुलेट पत्येक दोन वर्षांना बदलली जाईल.