बॅंकांच्या सेवा मोफतच - अर्थ मंत्रालय
बँकांकडून दिल्या जाणाऱ्या मोफत सेवा येत्या २० जानेवारीपासून बंद होणार आणि त्यासाठी पैसे मोजावे लागतील, असे वृत्त व्हायरल झाले होते. मात्र, असं काहीही नाही. बॅंकांच्या सेवा या मोफतच असतील, असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेय.
नवी दिल्ली : बँकांकडून दिल्या जाणाऱ्या मोफत सेवा येत्या २० जानेवारीपासून बंद होणार आणि त्यासाठी पैसे मोजावे लागतील, असे वृत्त व्हायरल झाले होते. मात्र, असं काहीही नाही. बॅंकांच्या सेवा या मोफतच असतील, असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेय.
बॅंकांच्या सेवांबाबत वृत्त निराधार
बॅंकांच्या सेवांबाबत वृत्त निराधारआहे. बँकेतील सेवांकरिता अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियात व्हायरल झाल्या होत्या. तरी त्यात काही एक तथ्य नाही. ही केवळ अफवा असल्याचे केंद्रीय अर्त मंत्रालयाने म्हटलेय.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा
बॅंकाबाबत जे वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवले गेले. या अफवांकडे कुणीही लक्ष देवू नये, असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलेय. ट्विटरवरील अफवांच्या मॅसेजवर अर्थ मंत्रालयाने रिट्विट केलेय. २० जानेवारीपासून मोफत सेवा बंद करण्याचा, असा कोणताही निर्णय झालेला नाही.
बँकिंग अशोसिएशनला सूचना
ही केवळ अफवा आहे. सोशल मीडियावरील अशा अफवांचे स्पष्टीकरण द्यावे, असा सल्लाही बँकिंग अशोसिएशनला अर्थ मंत्रालयाने दिलाय.