महत्वाची बातमी! कोरोनावरील लस २०२१ पूर्वी शक्य नाही
आयीएमआरने १५ ऑगस्टला लस मिळण्याचा केला होता दावा
मुंबई : आयसीएमआरने कोविड-१९ वरील लस येत्या १५ ऑगस्टपर्यंत उपलब्ध करण्याच म्हटलं होतं. मात्र आता प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या फीचरबद्दल आर्टिकल पब्लिश केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की, कोरोना व्हायरसवरील लस ही २०२१ पर्यंत येण्याची संभावना नाही.
मात्र त्यानंतरची बाब अशी की पीआयबीने या आर्टिकलमधून हा भाग काढून टाकला. हे आर्टिकल डॉ. टीवी वेंकटेश्वर यांनी लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की, २०२१ पर्यंक कोविड-१९ ची लस मिळणं शक्य नाही.
जगभरात १४० लसी आहेत ज्या मानवी चाचणीपर्यंत पोहोचल्या आहेत. यामध्ये भारतातील ११ लसींचा समावेश आहे. भारतातील कोवेव्सिन आणि ZyCov-D या दोन लसींची मानवी चाचणी सुरू करण्यात येत आहे. यावर विज्ञान मंत्रालयाने म्हटलं होतं की, यामधील कोणतीही लस ही २०२१ पर्यंत मिळण्याची शक्यता कमी आहे. या विधानाला काही काळातच हटवण्यात आलं.
आयसीएमआरने सुरूवातीला १५ ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस भारतात उपलब्ध करण्याची माहिती दिली होती. मात्र यानंतर हे विधान तातडीने बदलण्यात आलं.
आयसीएमआरने शनिवारी म्हटलं होतं की, या वैश्विक महामारीवर जलद लस शोधण्याचं काम केलं जात आहे. याकरता दिलेल्या सर्व नियमांच काटेकोरपणे पालन केलं जात आहे. आयसीएमआरचे डॉ. बलराव भार्गव यांनी म्हटलं की, भारताने बायोटेकसोबत केलेल्या करारानुसार विकसित केलेल्या 'कोवेक्सिन' करता मनुष्य चाचणीला परवानगी लवकरात लवकर देण्यास सांगितले आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, एकूण सहा भारतीय कंपन्या कोविड १९ लशीवर काम करीत आहेत. त्यात कोव्हॅक्सीन व झायकोव्ह -डी या दोन लशी जवळपास तयार आहेत. जगात एकूण १४० लस घटकांपैकी ११ लशी मानवी चाचण्यांच्या पातळीवर आहेत. यापैकी कुठलीच लस २०२१ च्या आधी येण्याची शक्यता नाही.