मुंबई : कोरोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन देशभरात पाय पसरवत आहे. त्याला तोंड देण्यासाठी सरकार आणि प्रशासन तयारी करत आहेत. अशा परिस्थितीत, तामिळनाडूच्या मदुराई जिल्हा प्रशासनाने सर्व सार्वजनिक ठिकाणांसाठी नोटीस जारी केली आहे, ज्यानुसार ज्यांनी कोविड-19 लसीकरण केलेले नाही, त्यांना 13 डिसेंबरपासून मदुराई जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस


जिल्हाधिकारी डॉ. एस. अनिश शेखर म्हणाले की, मदुराईमध्ये ज्यांनी कोरोनाची लस घेतलेली नाही, त्यांना 13 डिसेंबरपासून मदुराई जिल्ह्यातील सर्व दुकाने, व्यावसायिक आस्थापने, सुपरमार्केट, चित्रपटगृहे, लग्नगृहे, शॉपिंग मॉल, कपड्याची दुकाने, बँका आणि दारूची दुकाने अशा सार्वजनिक ठिकाणी आणि गर्दीच्या ठिकाणी बंदी घालण्यात येईल.


नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की, ज्यांनी लसीकरण केलेले नाही अशा लोकांना जिल्हा प्रशासन विचारणा करेल. जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले होते की, लोकांना कोविड-19 लसीचा किमान एक डोस घेण्यासाठी एका आठवड्याचा अवधी देण्यात आला आहे, असे न झाल्यास लोकांना सार्वजनिक ठिकाणी हॉटेल, शॉपिंग मॉल्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. दरम्यान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, तामिळनाडूने आतापर्यंत COVID-19 लसीचे 7,46,84,956 डोस दिले आहेत.


देशात ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे


देशात ओमाक्रॉनचा संसर्ग हळूहळू वाढत आहे. दिल्लीत एक नवीन प्रकरण समोर आले आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत ओमायक्रॉनचे सात नवीन रुग्ण आढळले आहेत, तर गुजरातमध्ये ओमिक्रॉनचे 2 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर देशातील ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 32 झाली आहे.