मुंबई : विविध प्रसार माध्यमांच्या एक्झिट पोलनुसार कर्नाटकात कोणालाच बहुमत मिळणार नसल्याची शक्यता आहे. टाईम्‍स नाऊ-वीएमआरच्या एक्झिट पोलनुसार कर्नाटकात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असेल. काँग्रेसचा 90 ते103 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला  80-93 जागा मिळण्याची शक्यता आहे. तिसऱ्या स्थानावर जेडीएसला 31-39 जागा मिळण्याची शक्यता आहे. 2 ते 4 जागा अपक्षांना मिळण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजतकच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला - 106 ते 118 जागा, भाजपला - 79 ते 92 जागा तर जेडीएस- 22 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. येथे देखील त्रिशंकू अवस्था दिसत आहे. राज्यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळत नसल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.


ओपिनियन पोलमध्ये कोणालाच स्‍पष्‍ट बहुमत नाही


कर्नाटक निवडणुकीत एक्जिट पोलच्या आधी ओपिनियन पोलमध्ये देखील कोणत्याही पक्षाला स्‍पष्‍ट बहुमत मिळणार नसल्याचं म्हटलं होतं. काही ओपिनियन पोल भाजपच्या बाजुने देखील आहे. राजेश्‍वरी आणि जयनगरमध्ये नंतर मतदान होणार आहे. 21 राज्यांमध्ये भाजपची आणि युतीची सत्ता आहे. कर्नाटकसह काँग्रेस फक्त 4 राज्यांमध्ये सत्तेत आहे. भाजपचा विजय झाला तर भाजपची 22 राज्यांमध्ये सत्ता असेल तर काँग्रेस 3 राज्यांमध्ये सत्तेत असेल.