नवी दिल्ली : रेल्वे तिकीट बुकिंग करताना, आधार नंबर गरजेचा नाही, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांनी शुक्रवारी उत्तर देताना म्हटलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्षीच्या जानेवारीपासून आधारच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटावरील सवलत मिळवण्यासाठी आधार कार्डची पडताळणी गरजेची असल्याचंही स्पष्ट केलं आहे. गोहेन म्हणाले की, रेल्वे तिकीट बुकींगसाठी १२ अंकी आधार नंबर बंधनकारक करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाच्या विचाराधीन नाही. 


पॅरिस करारान्वये, भारतातील प्रदूषणसंदर्भातील उत्सर्जन कमी करण्यासाठी लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे. त्यात उत्सर्जन कमी करण्यासाठी रेल्वे विभागाचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे, असे उत्तर एका प्रश्नाला उत्तर देताना गोहेन यांनी दिलं.