नवी दिल्ली : भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. भारताने केलेला हा सर्जिकल स्ट्राईक पहिला होता की नाही यावरुन अनेक चर्चाही रंगल्या. मात्र, आता या सर्जिकल स्ट्राईकवरुन मोठा खुलासा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय सैन्याकडून करण्यात आलेली सर्जिकल स्ट्राईक ही पहिलीच सर्जिकल स्ट्राईक होती. यापूर्वी कोणतीही सर्जिकल स्ट्राईक केल्याची नोंद सैन्याकडे नाहीये. माहिती अधिकारात मागवलेल्या अर्जाला भारतीय सैन्याने ही माहिती दिली आहे.


भारतीय सैन्याचे माहिती डायरक्टरेट जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स (DGMO) यांनी सांगितले की, २९ सप्टेंबर २०१६ रोजी एक सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली होती आणि त्याची नोंद आहे. यापूर्वी कुठल्याही सर्जिकल स्ट्राईक झाली असती तर त्याचीही नोंद असती. मात्र, तशी कुठल्याच प्रकारची नोंद नाहीये.


पाकिस्तानने उरी येथे केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. यावेळी भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे तळ उद्वधस्त केले होते.