...तर अॅम्बी व्हॅलीचा लिलाव होणार
सहारा समूहाचे मालक सुब्रत रॉय यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय.
नवी दिल्ली : सहारा समूहाचे मालक सुब्रत रॉय यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. सहारा-सेबीच्या खात्यात 552 कोटी रुपये भरण्यासाठी घालून दिलेली 15 जुलैची मुदत वाढवून देण्यास कोर्टानं नकार दिला. रॉय यांनी 4 जुलै रोजी 710 कोटी रुपये भरल्याची नोंद कोर्टानं घेतली.
24 हजार कोटींच्या देय रक्कमेची मुद्दल म्हणून दीड हजार कोटी रुपये आतापर्यंत सहारा यांनी जमा केले आहेत. यातले 9 हजार कोटी अद्याप शिल्लक आहेत. यातला 552 पूर्णांक 21 कोटींचा चेक 15 जुलैपर्यंत पास व्हायलाच हवा, असं न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपीठानं खडसावलंय. अन्यथा अॅम्बी व्हॅलीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मुंबई हायकोर्टाचे अधिकृत लिक्विडेटर विनोद शर्मा यांनी तयार केलेल्या लिलावाच्या अटींनाही सुप्रीम कोर्टानं आज मंजुरी दिली.