मुंबई : रेल्वेचे ऑनलाईन तिकिट बुक करणार्‍यांसाठी एक खुषखबर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्च २०१८ पर्यंत तुम्ही ऑनलाईन तिकिट बुकिंग करणार असाल तर त्यावरील सेवा शुल्कावर सूट देण्यात येणार आहे. 


नोटाबंदीच्या निर्णयानंतर डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सेवा शुल्कावर काही प्रमाणात सूट देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला होता.पूर्वी ३० सप्टेंबरपर्यंत सेवा शुल्कावर सूट जाहीर झाली होती, मात्र आता हा निर्णय मार्च २०१८ पर्यंत वाढवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. 


अधिकाधिक प्रवाशांनी ऑनलाईन बुकिंगचा पर्याय निवडावा याकरिता आता मोबिक्वीक आणि आयआरसीटीसी रेल कनेक्ट अ‍ॅप यांनी देखील एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मोबिक्विकचा वापर करताना प्रवासी डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड सोबतच नेट बॅंकिंग आणि वॉलेटचादेखील पर्याय वापरू शकतात.