नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान दरम्यान, स्वांतत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी किंवा महत्त्वाच्या दिवशी दोन्ही सीमा दलाकडून मिठाईची देवाणघेवाण होते, मात्र यावेळी दोन्ही देशांतील सीमेवर तणावाचं वातावरण असल्यानं मिठाईची देवाणघेवाण करण्याच्या परंपरेत खंड पडला आहे.


पाकिस्तानच्या वर्षभरापासून कुरापती वाढल्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या वर्षभरापासून कुरापती वाढल्या आहेत. पाकिस्तान सैन्याकडून सीमेवर वारंवार शस्त्रसंधीच्या उल्लंघन होत आहे, त्यामुळे सीमेवर तणावाचे वातावरण आहे, आणि पाकिस्तानच्या याच कुरापतीमुळे सीमा सुरक्षादलानं यंदा पाकिस्तानी रेन्जर्सनां मिठाई दिली नाही. 


मिठाईची देवाण घेवाण न करण्याचा निर्णय


वर्ष २०१७ मध्ये ७८, वर्ष २०१६ मध्ये ७४ आणि वर्ष २०१५ मध्ये ४३ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. त्यामुळे मिठाईची देवाण घेवाण न करण्याचा निर्णय सीमा सुरक्षा दलानं घेतला.


बांगलादेश आर्मीला दिली मिठाई


मात्र दुसरीकडे भारतीय सैन्यानं बांगलादेशमधील सुरक्षादलाच्या जवानांना प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मिठाई दिली आहे. भारत आणि पाकिस्तानं या दोन्ही देशातील संबध हे शत्रुत्त्वाचे असले, तरी महत्त्वाच्या दिवशी दोन्ही देशांतील सुरक्षा दल मिठाईची देवाणघेवाण करतात. पण, जर सीमेवर तणावाचे वातावरण असेल तर मात्र या परंपरेत खंड पडतो.