ना ट्रॅफिक पोलीस, ना ट्रॅफिक लाईटची गरज, या शहरात वाहतूक कशी `एकदम ओक्के
वाहुतक समस्येमुळे एकीकडे गोंधळ उडत असताना हे शहर मात्र त्याला अपवाद आहे
Trending News : जगात असे अनेक देश आहेत जे आपल्या पारंपारीक वास्तुकलेसाठी ओळखले जातात. एकापेक्षा एक आश्चर्यकारक कलाकृती इथे पाहायला मिळतात. चीनमध्ये सुध्दा असं एक शहर आहे जे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीसाठी ओळखलं जातं. विशेष म्हणजे या शहराची रचना एखाद्या कोळ्यावे विणलेल्या जाळ्यासारखी आहे.
चीनमधल्या या शहराचं नाव आहे टेकसी काऊंटी. या शहराची रचना अगदी नियोजित पद्धतीने करण्यात आली आहे. रस्ते अशा पद्धतीने बांधण्यात आले आहेत की इथं ट्रॅफिक लाईटची गरजच भासणार नाही. या शहराचा आकार एका त्रिकोणासारखा आहे.
चीनी धार्मिक परंपरेशी सुसंगत रचना
आठ त्रिकोण असलेल्या या डिजाईनला बागुआ म्हणतात. हे ताओ कॉस्मॉलॉजीमध्ये वापरले जातं. ज्योतिषशास्त्र, मार्शल आर्ट्स, भूगोल, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र किंवा चीनमधील कोणतीही शाखा असो, ताओ कॉस्मॉलॉजीच्या बागुआला बरीच मान्यता आहे. त्यामुळेच या शहराची रचना बागुवा आकाराची करण्यात आली आहे. या शहराची एकुण लोकसंख्या अडीच लाख इतकी आहे आणि यातल्या बहुसंख्य लोकांकडे असं असूनही नियोजनबद्धतेमुळे या शहरात ट्रॅफिक लाईटीची गरज भासत नाही.
शहरातील 8 रस्ते 4 मुख्य रिंग रोडने जोडण्यात आले आहेत. शहरातील लोकांना वाहतूकीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने शहराच्या एका बाजुला गाड्यांसाठी रस्ते बनवण्यात आले आहेत.
पर्यटकांसाठी हे शहर प्रमुख आकर्षण आहे. जगभरातील लाखो पर्यटक खास हे शहर पाहाण्यासाठी येतात. विशेष म्हणजे पर्यटकांना शहराची हवाई सफरही घडवली जाते.
शहरात एकूण 64 रस्ते आहेत, ज्यावर विविध रंगांचे स्ट्रीट लाईट बसवण्या आले आहेत. ते शहराच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतात.