नवी दिल्ली : दारूच्या नशेत दररोज देशाच्या कानाकोप-यात कितीतरी अपघात झाल्याच्या घटना समोर येत असतात. दारूच्या नशेत ड्रायव्हिंग करणारे कितीतरी लोक रोज पकडले जातात. यात महिलांचाही समावेश असतो. पण याबाबत दिल्लीतून एक आश्चर्यजनक आणि चांगला रिपोर्ट समोर आलाय. 


पोलिसांचा खुलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार दिल्लीत महिला दारू पिऊन कधीही ड्रायव्हिंग करत नाहीत. याला आधार म्हणून दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेल्या चलनांचा दाखला देण्यात आलाय. 


एकही गुन्हा दाखल नाही


या वृत्तानुसार, २०१७ मध्ये दिल्ली पोलिसांनी एकाही महिलेला दारूच्या नसेच ड्रायव्हिंग करताना बघितले नाही. २०१७ मध्ये दिल्लीतील एकाही महिलेवर दारू पिऊन ड्रायव्हिंग करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. तर या वर्षात केवळ एकाच महिले विरोधात चलान ठोकण्यात आलं. 


काय आहे कारण?


यामागचं कारण दिल्ली पोलीस असेही देतात की, शहरात ७१ पुरूष लायसन्स धारकांच्या तुलनेत केवळ एक महिला लायन्सेस धारक आहे.