Teacher Student Love Story: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) नोएडामध्ये एका शिक्षेकेचा आपल्याच विद्यार्थ्यावर (Student) जीव जडला आणि त्यानंतर ही शिक्षिका (Teacher Love Story) या अल्पवयीन विद्यार्थ्याला घेऊन फरार झाली आहे. या विद्यार्थ्याच्या वडिलांनी सेक्टर 113 पोलिस स्थानकामध्ये (UP Police) शिक्षिकेविरोधात तक्रार (UP Crime News) दाखल केली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.


क्लासमध्ये सुरु झालं प्रेमप्रकरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार सेक्टर 123 मध्ये राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणी घरीच ट्युशन क्लासेस (Education Calss) घेते. या तरुणीच्या घरासमोर राहणारा 16 वर्षीय मुलगा या तरुणीकडे शिकवणीसाठी यायचा. याचदरम्यान या दोघांमध्ये सूत जुळलं. दोघेही एकमेकांना आवडू लागले. प्रेमात पडलेल्या या दोघांनी एकत्र पळून जाण्याचा निर्णय घेतला. रविवारी दोघेही घरातून पळून गेले. या अल्पवयीन मुलाचे वडील मूळचे देवरियामधील आहेत. 


वडिलांनी तक्रारीत काय म्हटलं?


मुलाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीमध्ये 16 वर्षीय मुलगा रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास काकूकडे जातो असं सांगून घरातून निघून गेल्याच म्हटलं आहे. संध्याकाळपर्यंत तो परतला नाही त्यावरुन वडिलांच्या मनात शंकेची पाल चुकचूकली. त्यानंतर त्यांनी पोलिस स्थानकात जाऊन मुलाला शिकवणाऱ्या तरुणीनेच भूरळ घालून त्याला पळवून नेल्याचा आरोप केला आहे. मुलाच्या वडिलांनी या तरुणीविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे.


वडिलांची शंका खरी असल्याची शक्यता


या प्रकरणामध्ये पळून गेलेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या दोघांना ओळखणाऱ्या आणि या ट्यूशन क्लासला जाणाऱ्या काहीजणांची चौकशी पोलिसांनी केली असून त्यामधून प्राथमिक तपासाची दिशा ठरवण्यात आली आहे. प्रेम प्रकरणामधूनच हे दोघे पळून गेल्याच्या या विद्यार्थ्याच्या वडिलांच्या दाव्याला दुजोरा देणारी माहिती प्राथमिक तपासामधून समोर आली आहे.


लवकरच शोध लागेल


या प्रकरणामध्ये अतिरिक्त पोलिस उपायुक्त अशुतोष द्विवेदी यांनी तक्रारीच्या आधारे तपास सुरु करण्यात आल्याचं सांगितलं. या दोघेही प्रेमात पडल्याच्या माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. सर्व्हिलन्स आणि अन्य माध्यमातून या दोघांचा तपास सुरु केला आहे. लवकरच दोघांचा शोध लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. अशाप्रकारे एखादी शिक्षिका विद्यार्थ्याबरोबर पळून जाण्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेकदा अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत.