खेरियाकानी : चार्जिंगला लावलेल्या मोबईलचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात १९ वर्षांच्या एका तरूणीचा मृत्यू झाला आहे. ओडिशातील खेरियाकानी येथे ही घटना घडली.मृत्यू झालेल्या तरूणीचे नाव उमा ओरम असे आहे. फोन चार्जिंगला लावून ती आपल्या नातेवाईकांशी बोलत होती. बोलता बोलता अचानाक मोबाईलचा स्फोट झाला. झालेल्या स्फोटात तरूणीचा चेहरा अतिशय गंभीर जखमी झाला. घटनेनंतर तरूणीला रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, तरूणीचा रूग्णालयात मृत्यू झाला. मृत तरूणीच्या भाऊ दुर्गा प्रसात ओरम याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, फोन चार्जिंगला लावून ती नातेवाईकांशी बोलत होती. मात्र, मोबाईलच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला. आवाजाने आम्ही लगेच तिच्याकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत ती बेशुद्ध पडली होती. रूण्गालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईलचे उत्पादन बंद


दरम्यान, नोकिया ५२३३ हा अत्यंत जूना मोबाईल आहे. हा मोबाईल ओएस (ओपरेटींग सिस्टम) वर काम करतो. हा मोबाईल कंपनीने अधिकृतरित्या बनवला आहे. तसेच, आता तो बंदही झालाला आहे. नव्या बनावटीचे नोकिया फोन हे अॅड्रॉईड सिस्टमवर चालत आहेत. हे मोबाईलही एचएमडी ग्लोबल तयार करते.