नवी दिल्ली : केंद्रीय परिवहन मंत्रालयाने मोटर वाहन कायद्यांमध्ये बदल केला आहे. हा बदल वाहन मालकीच्या संदर्भातील आहे. नवीन नियमांनुसा वाहनाची नोंदणी करताना नॉमिनीचीही(वारस) नोंदणी करता येणार आहे. केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा 1989 च्या काही नियमांमध्ये बदल केला आहे. नवीन नियमांनुसार वाहन मालकाच्या मृत्यू नंतर वाहनाची मालकी ट्रान्सफर करणे सोपे होणार आहे. (Motor vehicle rules changed)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहनाच्या मालकाला वाहनाची नोंदणी करताना नॉमिनीचे नाव नमुद करण्याची सुविधा यापुढे उपलब्ध असणार आहे. किंवा नंतर ऑनलाईन अर्ज करून नॉमिनीची नोंद करता येईल. वाहन मालकाला नॉमिनीचे योग्य ओळखपत्राचे पुरावे नोंदणी करताना जमा करावे लागणार आहे.


नवीन नियमावलीनुसार, वाहन मालकाच्या मृत्यूनंतर वाहनाच्या नोंदणीवेळी ज्या व्यक्तीला वारस लावले असेल. तो व्यक्ती त्या वाहनाचा मालक असेल. त्यासाठी वारसाने वाहन मालकाच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे वाहन मालकाच्या मृत्यूची माहिती देणं गरजेचं आहे. 


नॉमिनीने काय करावं ?
वाहन मालकाच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांत वारसाने मालकी हक्क मिळवण्यासाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे फॉर्म 31 साठी अर्ज करावा.  त्यानंतर वारसाचे नाव वाहन मालक म्हणून ट्रान्सफर होईल.