`मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव, शिवसेनेचा पाठिंबा नाही`
येत्या सोमवारी संसदेत येऊ घातलेल्या मोदी सरकारविरोधातल्या अविश्वास ठरावाला शिवसेनेचा पाठिंबा देणार नाही, असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.
नवी दिल्ली : येत्या सोमवारी संसदेत येऊ घातलेल्या मोदी सरकारविरोधातल्या अविश्वास ठरावाला शिवसेनेचा पाठिंबा देणार नाही, असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.
चंद्राबाबू नायडूंनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावर सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतलाय. त्याला सर्व विरोधीपक्षांनी पाठिंबा दिलाय. पण हा ठराव टिकणार नाही, अशी शक्यता अधिक आहे.
विरोधक हात दाखवून अवलक्षण करत असल्याचा दावा शिवसेना खासदार संदजय राऊत यांनी केलाय. त्यामुळे मोदी सरकारला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.