नवी दिल्ली : कोरीयन द्विप्रकल्पातील संघर्षाने टोक गाठले असून, हा तणाव अण्वस्त्रयुद्धात परावर्तीत होण्यीची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी अण्वस्त्रयुद्ध सुरू होऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाल्याचे कोरियाचे उच्चायुक्त किम इन रयोंग यांनी म्हटले आहे. ते युनायटेड नेशन्समध्ये बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किम इन रयोंग यांनी म्हटले आहे की, जगभरातील सर्व देशांपैकी उत्तर कोरिया हा असा एकमेव देश आहे की, ज्याला १९७० पासून अमेरिकेकडून अण्वस्त्रहल्याची भीती आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी स्वत:ला अण्वस्त्रसज्ज ठेवणे हा उत्तर कोरियाचा अधिकार आहे. अमेरिकेकडून कोरियायी द्विप्रकल्पामध्ये केल्या जाणाऱ्या सैन्य अभ्यासावरही किम रयोंग यांनी निशाणासाधला आहे. त्याचबरोबर उत्तर कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग यांना मारण्याचा कट अमेरिका रचत असल्याचा आरोपही रयोंग यांनी केला आहे. त्यासाठी अमेरिका एक सिक्रेट ऑपरेशन राबवत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.


किम रयोंग यांनी म्हटले आहे की, या वर्षी उत्तर कोरिया न्यूक्लिअर फोर्स तयार करत आहे. जी अण्वस्त्रांनी पूर्णपणे सज्ज झाली आहे. या फोर्सजवळ वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब आहेत. यात अॅटम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब आणि अइंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक रॉकेट्स आहेत. त्यामुळे अमेरिकेने जर उत्तर कोरियाच्या एक इंच जागेत जरी प्रवेश केला तर, त्याची मोठी ताकद अमेरिकेला भोगावी लागेल, असा इशाराही किम रयोंग यांनी दिला आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी पहिला बॉम्ब पडेपर्यंत आपण राजनयिक प्रयत्न कायम ठेऊ, असे रविवारी म्हटले होते. त्यावर बोलताना अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे ही आमचा अनमोल संपत्ती आहे. जे कोणत्याही स्थितीमध्ये बदलली जाणार नाही.