मणिपूर, आसाम राज्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती
राज्यभरात मुसळधार पाऊस
मुंबई : मणिपूर, आसाम आणि त्रिपुरासह अनेक राज्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मणिपूरमध्ये पूरात अनेक जणांचे प्राण गेल्याचं वृत्त आहे. तर दिड लाख लोकं पूरामुळे बेघर झाली आहेत. पूरात आत्तापर्यंत एक हजार घर उध्द्वस्त झाली आहेत. इंफाल भागातही पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नागरिकांना वाचवण्यासाठी आसाम रायफल्स आणि सैन्यातर्फे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहेत.
आसामच्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठलीय. आहे . हैलाकांडी जिल्ह्यातले अनेक नागरिक पूरात अडकले आहेत.