देशभरात ऑक्टोबर (october heat) हीट सुरु असताना उत्तरेकडील काही राज्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टी (snowfall) सुरु झालीय. उत्तराखंड,  काश्मिरमध्ये बर्फवृष्टी होत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशात भगवान शंकराचे (Lord Shiva) एक हजार वर्ष जुने मंदिर सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नॉर्वेच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याने एरिक सोल्हेम (Norwegian diplomat Erik Solheim) यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर (twitter) शेअर केला आहे. एरिक सोल्हेम  हे 'इन्क्रेडिबल इंडिया' (Incredible India)च्या मनमोहक सौंदर्याने थक्क झाले आहेत. (Norwegian diplomat shared the video of World Highest Lord Shiva Temple)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच वडोदरा येथील भव्य अशा गरब्याचा एक ड्रोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. असाच एक ड्रोन व्हिडिओ समोर आला आहे, जो एरिक सोल्हेम यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये , 'अतुल्य भारत! जगातील सर्वात उंच महादेव मंदिर ( Lord Shiva Temple). 5000 वर्षे जुने असल्याचे मानले जाते! उत्तराखंड (uttarakhand),' असे म्हटलं आहे. एरिक हे त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भारतातील अनेक भागांतील मनमोहक व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात.


हिमालयातील सर्वोच्च शिवमंदिराचा ( Lord Shiva Temple) हा चित्तथरारक ड्रोन व्हिडिओ ट्विटरवर 7 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 52  हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ 360 डिग्री एरियल व्ह्यूचा आहे. व्हिडिओमध्ये पर्वतांच्या मधोमध असलेले शिवमंदिर पूर्णपणे बर्फाने झाकलेले दिसत आहे. 



व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने, 'हे सर्वात उंच मंदिर नाही आणि मंदिराची रचना 5000 वर्षे जुनी नाही. हे एक सुंदर मंदिर आहे आणि चुकीच्या विशेषणांची गरज नाही, असं म्हटलं आहे. तर दुसर्‍या एका युजरने, 'पंच केदारांपैकी एक तुंगनाथ महादेव मंदिर. मंदिराकडे जाण्याचा मार्ग अतिशय प्रेक्षणीय आहे. थोडे वर चंद्रशिला आहे, जिथून हिमालयाच्या शिखरांचे 270 अंश रुंद दृश्य दिसते, असे म्हटले आहे.


दरम्यान, सरकारी माहितीनुसार, तुंगनाथ हे उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात 3,680 मीटर उंचीवर असलेले जगातील सर्वात उंच शिव मंदिर आहे. हे मंदिर एक हजार वर्षे जुने असल्याचे मानले जाते.