मुंबई : मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी सीईओ पद सोडण्याची घोषणा केली आहे. आता ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल असतील. म्हणजेच आणखी एका अमेरिकन टेक कंपनीची कमान भारतीयाच्या हाती आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी भारतीय अनेक अमेरिकन टेक कंपन्यांचे सीईओ म्हणून काम करत आहेत. आम्ही तुम्हाला काही मोठ्या अमेरिकन टेक कंपन्यांबद्दल सांगत आहोत, ज्यांची कमान भारतीयांच्या हातात आहे.


गुगल - सुंदर पिचाई



सुंदर पिचाई यांनी आयआयटी मद्रासमधून शिक्षण घेतले आहे. त्यांना 2015 मध्ये गुगलचे सीईओ बनवण्यात आले होते. 2019 मध्ये, त्यांना Google च्या मूळ कंपनी Alphabet चे CEO देखील बनवण्यात आले. सुंदर पिचाई 2004 मध्ये गुगलमध्ये रुजू झाले होते.


पिचाई यांनी Google Toolbar च्या Lyx, Chrome डेव्हलपमेंट आणि Google Browser वर काम केले आहे. 2012 मध्ये त्यांना प्रोडक्ट डेव्हलपमेंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष बनवण्यात आले. 2 वर्षांनंतर, ते Google आणि Android स्मार्टफोन OS चे उत्पादन प्रमुख बनले.


मायक्रोसॉफ्ट - सत्या नाडेला



2014 मध्ये सत्या नडेला यांना मायक्रोसॉफ्टचे सीईओ बनवण्यात आले होते. सत्या नाडेला 1992 पासून मायक्रोसॉफ्टचा भाग आहेत. सत्या यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये मोठ्या उत्पादनांवर काम केले आहे. यामुळे, कंपनीला क्लाउड कॉम्प्युटिंगकडे जाण्यास मदत झाली. त्यांनी कर्नाटकातील मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून शिक्षण घेतले आहे.


IBM - अरविंद कृष्णा



एप्रिल 2020 मध्ये, अरविंद कृष्णा यांना IBM चे CEO बनवण्यात आले. त्यांनी 1990 मध्ये IBM मधून करिअरला सुरुवात केली. अरविंद यांनी आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतले आहे. कृष्णा यांनी इलिनॉय विद्यापीठातून पीएचडी केली आहे.


Adobe - शंतनू नारायण



शंतनू नारायण हे 2007 पासून Adobe चे CEO आहेत. ते 1998 मध्ये वरिष्ठ VP म्हणून कंपनीत रुजू झाले. ते उत्पादनाच्या विकासाकडे लक्ष देत होते. 2005 मध्ये त्यांना कंपनीचे सीओओ बनवण्यात आले आणि त्यानंतर दोन वर्षांनी त्यांना सीईओ पदाची जबाबदारी देण्यात आली. शंतनू नारायण यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.


VMWare - रघु रघुरामन



एप्रिल 2021 मध्ये, रघु रघुरामन यांना VMWare चे CEO बनवण्यात आले. त्याने 2003 मध्ये VMWare मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. कंपनीमध्ये, ते ESX आणि vSphere ही लिडिंग प्रोडक्टवर काम करीत होते. रघु रघुरामन यांनी आयआयटी बॉम्बेमध्ये शिक्षण घेतले