`शहरातून जाणारा हायवे डिनोटीफाय करण्यात चूक नाही`
हायवे शहरातून जात असेल आणि ते डिनोटीफाय केले तर त्यात चुकीचे काहीच नाही
नवी दिल्ली : हायवे शहरातून जात असेल आणि ते डिनोटीफाय केले तर त्यात चुकीचे काहीच नाही, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय. हायवेपासून 500 मीटर अंतराच्या आत दारू आणि मद्यविक्री करण्यास बंदी घालण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. मात्र शहरातून जाणारा हायवे आणि शहराबाहेरील हायवे यात फरक आहे.
ज्या रस्त्यावरून वेगात गाड्या जातात, तो रस्ता हायवे असतो. शहरातून गाड्या वेगात जात नाहीत, असंही कोर्टानं स्पष्ट केलं. चंडीगड येथील याचिकाकर्त्यानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, त्यावरील सुनावणीच्या वेळी कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलं.