Ration Card | रेशन कार्ड नसलं तरी मोफत अन्नधान्य मिळणार, जाणून घ्या कसं?
सर्वसामान्यांना रेशन कार्डाद्वारे (Ration Card) स्वस्त दरात अन्नधान्य मिळतं. त्यासाठी रेशन कार्ड असणं गरजेचं असतं.
मुंबई : रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सर्वसामान्यांना रेशन कार्डाद्वारे स्वस्त दरात अन्नधान्य मिळतं. त्यासाठी रेशन कार्ड असणं गरजेचं असतं. कोरोना काळात केंद्र सरकारने विविध राज्यांमध्ये काही महिन्यांसाठी मोफत अन्नधान्य (Free Ration) दिलं. आताही केंद्र सरकार मोफत अन्नधान्य देत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये मोफत अन्नधान्य दिलं जात आहे. यानंतर दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये 'वन नेशन वन रेशन कार्ड योजना'नुसार (One Nation One Ration Card Scheme) इतर राज्यातील जनतेला मोफत अन्नधान्य मिळण्यास सुरुवात झाली आहे. (now even if there is no ration card ration will be available for free know the process immediately)
दिल्लीशिवाय, महाराष्ट्र, यूपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड या राज्यात आधीपासूनच विना रेशन कार्ड अन्नधान्य दिलं जात आहे. रेशन कार्ड नसतानाही मोफत अन्नधान्य कसं मिळवायचं, हे आपण जाणून घेऊयात.
वन नेशन वन रेशन कार्ड
दिल्ली सरकारकडून 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजनेनुसार, अन्नधान्यचं पीओएसच्या माध्यमातून वितरित केलं जात आहे. आता यानुसार, लाभार्थ्यांना विना रेशन कार्ड मोफत अन्नधान्य मिळू शकतं. मात्र यासाठी तुमचं रेशन कार्ड हे आधार कार्ड किंवा बँक खात्याशी लिंक असणं बंधनकारक आहे. त्यामुळे तुम्हाला रेशन कार्डाविना अन्नधान्य हवं असेल, तर रेशन कार्ड आधार किंवा बँक खात्यसह लिंक असणं गरजेचं आहे.