नवी दिल्ली : आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांसोबत लिंक केल्यानंतर आता केंद्र सरकारने आणखीन एक योजना आखली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधार कार्ड सर्वच महत्वाच्या सेवांसोबत जोडण्याचं केंद्र सरकारने निश्चित केलं आहे. त्यानुसार, आधार-पॅन जोडण्यात आलं. मग सिम कार्डसोबत आधार कार्ड लिंक करण्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर आता ड्रायव्हिंग लायसन्ससोबत आधार कार्ड जोडण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे.


केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सांगितलं की, ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा आधार कार्डसोबत जोडण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. यासाठी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा केली आहे.


रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं की, मनी लॉन्ड्रिंग रोखण्यासाठी पॅन-आधार लिंक करण्यात आलं. आता ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डसोबत जोडलं तर डुप्लिकेट लायसेन्सवर लगाम लागेल. आधार एक डिजिटल आयडेंटिटी आहे आणि डिजिटल गव्हर्नंस एक चांगलं शासन असतं.


अनेकजण डुप्लिकेट लायसन्स जवळ बाळगतात आणि दारु पिऊन गाड्या चालवतात. मात्र, आधार-लायसन्स लिंक झाल्यास अशा कृत्यांनाही आळा बसेल.


केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड लिंक करण्याची योजना आखली आहे. यापूर्वी पॅन-आधार आणि सिम कार्ड-आधार लिंक करणं अनिवार्य केलं आहे. जर तुम्ही पॅन कार्डसोबत आधार लिंक केलं नसेल तर तुम्हाला आयटीआर फाइल करण्यात अडचण येईल.