25 सेकंदात फोन उचला, नाहीतर..
नाहीतर तुम्हाला बसेल फटका
मुंबई : टेलिकॉम कंपन्यांमधून एक अजब नियम समोर आला आहे. तुम्हाला येणाऱ्या फोनची रिंग फोन 25 सेकंदच वाजणार आहे. म्हणजे फक्त 8 वेळाच घंटी वाजणार आहे आणि त्यानंतर कॉल कट होणार आहे.
काही दिवसांपूर्वी आऊटगोइंग कॉलची रिंग किती ड्युरेशन वाजणार 25 सेकंद की 40 सेकंद यावरून वाद सुरू होता. आता अखेर सगळ्या कंपन्यांनी हे ड्युरेशन 25 सेकंदाचं केलं आहे. जिओने आपल्या नेटवर्कमधून आऊटगोइंग कॉल्सची रिंग ड्युरेशन कमी करून 25 सेकंद केल्यानंतर या वादाला तोंड फुटलं. या अगोदर ही वेळ 40 सेकंद इतकी होती. सुरूवातीला जिओने हे पाऊल उचललं त्यानंतर इतर वोडाफोन, एअरटेल, आयडीया यासारख्या कंपन्यांनी देखील हा निर्णय मान्य केला.
यामागचं अर्थकारण काय?
इंटरकनेक्ट उपयोग शुल्क (IUC) कढून जे चार्ज लागतं ते कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या नेटवर्कवरून फोन केला जातो तो समोरच्या नेटवर्कला IUC शुल्क देतात. हा चार्ज प्रति मिनीटाच्या आधारावर दिला जातो.
वेळ कमी केल्यामुळे फोन उचलता येईलच असं नाही. यावरून मिस्ड कॉलची संख्या वाढेल. मिस कॉल पाहिल्यानंतर फोन करण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे IUC चा भार दुसऱ्या नेटवर्कवर जाईल. हा नियम फक्त एकाच नेटवर्कवर कॉल करण्यावरून नाही आहे.
तसेच टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने (TRAI) रिंग वाजण्याच्या वेळवर कोणताही निर्णय दिला नाही. याचा निर्णय ते 14 ऑक्टोबर रोजी चर्चा करून देणार आहे. तोपर्यंत 25 सेकंदात फोन उचला अन्यथा पुन्हा फोन करण्याची वेळ येईल.