आता हॅशटॅग वापरूनही शोधता येणार गूगल मॅपवरचे ठिकाण
गूगलकडून अँड्रॉईड मोबाईलधारकांना एक नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे आता युजर्सना हॅशटॅग वापरून गूगल मॅपवर एखादे ठिकाण शोधता येईल.
सॅन फ्रान्सिस्को: गूगल कडून अँड्रॉईड मोबाईलधारकांना एक नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे आता युजर्सना हॅशटॅग वापरून गूगल मॅपवर एखादे ठिकाण शोधता येईल. या फिचरमुळे युजर्सना एखाद्या जागेचा रिव्ह्यू लिहताना पाच हॅशटॅग वापरता येतील. मात्र, #love किंवा #food यासारखे सर्वसाधारण हॅशटॅग यासाठी फायदेशीर ठरणार नाहीत, असे गूगल कडून स्पष्ट करण्यात आले
या फिचरचा वापरासाठी अँड्रॉईड धारकांना रिव्ह्यूमध्ये असलेल्या हायपरलिंकवर क्लिक करावे लागेल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर युजर्सना सेम हॅशटॅग असलेल्या इतर ठिकाणांबद्दल जाणून घेता येईल.
अलीकडेच गूगल कडून मॅप्समध्ये अनेक नवीन फिचर्स समाविष्ट करण्यात आली होती. यापैकी 'फॉलो' या फिचरमुळे युजर्सला उद्योग व आर्थिक घडामोडींविषयीचे अपडेटस मिळणे शक्य झाले. होते. तर माय बिझनेस फिचरने व्यवसायिकांना गूगल मॅपवर त्यांची प्रोफाईल आणि इतर मजकूर अपलोड करण्याची सोय उपलब्ध करून दिली. यामध्ये रिव्हू किंवा मेसेजला रिप्लाय देण्याचाही सुविधेचा समावेश आहे.