नवी दिल्ली : सरकारी किंवा इतर कोणत्याही कामांसाठी पॅन कार्ड (PAN Card) अतिशय आवश्यक आहे. आता नवीन पॅन कार्ड काढण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. कोणताही फॉर्म न भरताच पॅन कार्ड मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM nirmala sitharaman)  यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर करताना नव्या व्यवस्थेची घोषणा केली. सरकारच्या या घोषणेमुळे सामन्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.


आधारकार्डवरुन बनवा पॅन कार्ड - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास पॅन कार्ड नंबर किंवा आधार कार्ड नंबर आवश्यक आहे. आधी पॅन कार्ड बनवण्यासाठी अधिक वेळ वाट पाहावी लागत होती. पण आता सरकारने अर्थसंकल्पात आधार नंबरवरुनच पॅन कार्ड बनवण्यात येणार असल्याची घोषणा केली. पॅन कार्ड काढण्यासाठी फॉर्म भरण्याची गरज नाही. केवळ आधारच्या नंबरवरुनच पॅन कार्ड नंबर मिळण्याची सुविधा सुरु होणार आहे.


अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी, गेल्या अर्थसंकल्पात पॅन आणि आधारच्या इंटरचेंजेबिलिटीची सुरुवात केली असल्याचं सांगितलं. त्यासाठी आवश्यक ते नियम आधीच अधिसूचित करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या. पॅन नंबर मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. लवकरच यासाठी एक नवीन सिस्टम सुरु करण्यात येणार आहे.


  


३१ मार्चपर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे. आधी पॅन-आधार लिंक करण्याची तारीख ३१ डिसेंबर ठेवण्यात आली होती. मात्र त्यानंतर ती वाढवून आता ३१ मार्चपर्यंत करण्यात आली आहे. पॅन-आधार लिंक करण्याची तारीख पहिल्यांदाच वाढवण्यात आलेली नाही. यापूर्वी सात वेळा या पॅन-आधार लिंक करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे.


आताच्या आणखी काही सर्वात महत्त्वाच्या बातम्या


आसाममध्ये नदीला आग, तीन दिवसांपासून धगधगतेय


...आता पॅन कार्ड काढणं अधिक सोप्पं


जगातील कोणत्याच बाप-लेकीसोबत असं घडू नये


'महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग'


दिग्दर्शकाच्या मदतीसाठी पुढे सरसावला खिलाडी कुमार