नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने खाद्यपदार्थांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. त्यानुसार प्रवाशांना त्यांचा फीडबॅक ऑनलाईन देता येणार आहे. जेवण चांगले, वाईट किंवा वाईट असे खाल्ल्यानंतर लगेचच कळणार आहे.

ही नवीन प्रणाली पुढील काही आठवड्यात मुंबई राजधानीत अधिकृतपणे लाँच केली जाणार आहे. या योजनेचे रेल्वेचे ऑफलाईन वर्जनदेखील दिसेल कारण इंटरनेट प्रवासात अनेक अडचणी येतात. टॅबलेट सॉफ्टवेअर हे प्रवासी नाव, फोन नंबर आणि रेल्वे तपशील रेकॉर्ड करणार आहे. अहमदाबाद-दिल्ली राजधानी मध्ये शुक्रवारी प्रथमच ही सुविधा देण्यात आली.  

आतापर्यंत आयआरसीटीसी सध्या ऑन-बोर्ड सजेशन बुक, किंवा त्याच्या ट्विटर हँडलद्वारे अभिप्राय घेत आहे. तसेच प्रवासी १३९ वर कॉल करू शकता आणि अन्न गुणवत्तेबाबत तक्रार करीत असतात. पण आता या नव्या पद्धतीने गुणवत्ता सुधारण्यास अधिक मदत होणार आहे.

प्रवासादरम्यान मिळालेल्या अन्नाच्या दर्जाशी संबंधित प्रश्नांना प्रवासी गुण देऊ शकणार असल्याचे आयआरसीटीसीचे मुख्य प्रवक्ते पिनुनिन मोरावाला यांनी सांगितले.

समस्या जाणून घेणार 


जेवणाची क्वालीटी, क्वांटीटी, प्रेझेंटेशन, कर्मचाऱ्याची वागणूक या सर्वांना मिळून १ ते ५ गुण प्रवासी देणार आहेत. जर ३ पेक्षा कमी गुण दिले तर प्रवाशाकडून त्याची समस्या जाणून घेतली जाणार आहे.