नवी दिल्ली : विमान यात्रा करण्यासाठी आता नवा नियम लागू केला गेला आहे. आता विमानाने प्रवास करण्यासाठी तिकिट बुक करतांना तुमची डिजिटल विशिष्ट ओळख तुम्हाला दाखवावी लागणार आहे. राज्यसभेत याबाबतची माहिती मंगळवारी देण्यात आली.


सरकारने पेपरलेस यात्रेच्या सुविधेसाठी हा नवा नियम आणला आहे. पण हा कधीपासून लागू होणार याबाबत अजून कोणताही माहिती आलेली नाही. विमानाने प्रवास करण्याआधी एयरपोर्टवर प्रवेशासाठी तुम्हाला ओळखपत्र आवश्यकता असते. मागील महिन्यात नागरी उड्डाण मंत्रालयाने जाहीर केलं होतं की, प्रवाशांना आधार, पॅन कार्ड, पासपोर्ट नंबरची माहिती द्यावी लागेल.