मुंबई : तात्काळ पासपोर्ट आता चक्क तीन दिवसात मिळणार आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. पासपोर्टवर तुमचा घरचा पत्ता नसणार?, आता 'आधार' मस्ट


ही अट शिथिल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर्वी तात्काळ पासपोर्ट मिळण्यासाठी क्लास वन श्रेणीतील अधिकाऱ्याकडून सत्यप्रत प्रमाणपत्र देण्याची अट होती. मात्र ती शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता चक्क तिसऱ्या दिवशी पासपोर्ट तुमच्या हाती असेल. पण त्यासाठी तुम्हाला ३,५०० रुपये मोजावे लागतील. 'या' देशाचा पासपोर्ट सर्वात महाग!


मात्र हे प्रमाणपत्र अनिर्वाय


नियमाप्रमाणे पासपोर्टसाठी आधार कार्डासोबत विविध १२ प्रमाणपत्र द्यावी लागतात. त्यापैकी दोन प्रमाणपत्रांची पूर्तता करणे अनिर्वाय आहे. ही पूर्तता झाल्यानंतर पासपोर्ट तयार होईल आणि पोलीस रिपोर्ट मागवण्यात येईल. श्रमिकांसाठी 'भगवा' पासपोर्ट, काँग्रेसची जोरदार टीका


रंग बदलण्याचा निर्णय बारगळला


तर पासपोर्टचा रंग बदलून तो नारंगी करण्याचा सरकारचा निर्णय १७ दिवसाताच सरकारने बदलला आहे. त्याचबरोबर शेवटच्या पानावर खाजगी माहिती छापण्याचा निर्णयही मागे घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पासपोर्टमध्ये होणार हे '५' मोठे बदल!