नवी दिल्ली : देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (National Security Advisor ) अजित डोवाल यांना केंद्र सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. सरकारने आजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्य़ाचा निर्णय घेतला आहे. यासोबत अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार देखील राहणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजीत डोवाल यांची आतापर्यंतची कामगिरी आणि त्यांचं योगदान पाहता केंद्र सरकारने त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची ही नियुक्ती पाच वर्षासाठी असेल.



सीआरपीएफ जवानांवर पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवाही ठिकाणांवर एअर स्ट्राईक आणि त्याआधी केलेलं सर्जिकल स्ट्राईक आणि म्यानमार स्ट्राईक यामाचं संपूर्ण श्रेय हे अजित डोवाल यांना जातं. डोवाल हे सर्जिकल स्ट्राईकचे मास्टरमाइंड मानले जातात.


डोभाल पाकिस्तानच्या लाहोरमध्ये देशाचे गुप्तहेर म्हणून 7 वर्ष मुस्लीम बनून राहिले होते. भारतातील लष्कराचा मानाचा सन्मान असलेल्या कीर्ती चक्र पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. हा सन्मान मिळवणारे ते पहिले अधिकारी होते.


1968 केरळ बॅचचे आयपीएस ऑफीसर अजीत डोवाल यांची नियुक्तीच्या चार वर्षानंतर 1972 मध्ये ते इंटेलीजेंस ब्यूरोसोबत जोडले गेले. अजीत डोवाल यांना अधिकवेळ हा गुप्तचर विभागात काम केलं आहे.


1989 मध्ये अजीत डोवाल यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून कट्टरतावाद्यांना बाहेर काढण्य़ासाठी 'ऑपरेशन ब्लॅक थंडर'चं देखील नेतृत्व केलं होतं. 30 मे 2014 ला पंतप्रधान मोदी यांनी अजीत डोवाल यांना देशाचे 5वे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त केलं होतं.