NSC Post Office Scheme 2023: सध्या आपल्याला कुठेतरी गुंतवणूक करणे आवश्यक असते. तुम्ही कुठेही चांगल्या योजनेतून गुंतवणूक केलीत तर तुम्हाला व्याजावर (Interest Rate on Investment) चांगला परतावा मिळू शकतो. तेव्हा अशीच एक योजना आहे. ती म्हणजे नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (National Saving Certificate) या योजनेतून. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला तगडा परतावा मिळू शकतो. केंद्र सरकारनं 1 एप्रिल 2023 पासून पोस्ट ऑफिसच्या अनेक छोट्या सेव्हिंग स्किम्समधून (Saving Schemes) व्याजदर वाढवले आहेत. यात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचाही समावेश आहे. यातून तुम्हाला 7.7 टक्क्याचे व्याज मिळेल. यातून तुम्हाला कंपाऊंडिग इंटरेस्टचा फायदा होऊ शकतो. (NSC Post Office 2023 how much will you earn from national saving certificate in next 5 years)


किती मिळेल व्याज आणि परतावा? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर का तुम्हाला 7.7 टक्क्यांचे व्याज या योजनेतून मिळणार असेल आणि तुम्ही 10 लाखांपर्यंत गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला पुढच्या पाच वर्षांच्या लॉन इन पिरियडनुसार (Lock in Period) कॅल्क्यूलेशन करता येईल. तुमची प्रन्सिपल अमाऊंट (Principal Amount) 10 लाख रूपये आहे. यानुसार तुम्हाला 4,49,034 रूपये व्याजातून मिळतील. यातून प्रिन्सिपल अमाऊंट आणि व्याजाची संपुर्ण रक्कम मिळून तुम्हाला एकूण 14,49,034 रूपये परतावा मिळेल. म्हणजे 10,00,000 रूपये + 4,49,034 व्याजातून रक्कम = 14,49,034 रूपये अशी रक्कम तुम्हाला परत मिळेल. 


प्रत्येक योजनेतून तुम्ही काही प्रमाणात रक्कम गुंतवू शकता. या योजनेतून तुम्ही 1.5 लाख रूपयांपर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. या योजनेतून तुम्हाला सुरूवातीला गुंतवणूकीवर आणि व्याजवर पहिल्या चार वर्षांसाठी इनकम टॅक्स सेक्शन 80C नुसार टॅक्सवर शूट मिळते. या योजनेत दोन प्रकार आहेत. एक आठ आणि नववा इशू (NSC VIII and IX Issue) असे दोन प्रकार असतात त्यातल्या आठव्या इशूतून तुम्ही गुंतवणूक करू शकता. यातून लॉक इन पिरियडही येतो. त्याचसोबत पाच वर्षांनंतर तुम्हाला प्रिसिंपल अमाऊंट आणि व्याजचे पैसे परत मिळतात. 


हेही वाचा - ग्राहकांनो इथे लक्ष द्या; Expiry Date न पाहताना पदार्थ विकत घेऊ नका, आरोग्याचे वाजतील बारा! 


म्युच्योरिटीनंतर आपल्याला किती मिळतील पैसे? 


जेव्हा योजनेतून तुम्हाला म्युच्योरिटी (Maturity) मिळते. जेव्हा ती रक्कम म्युच्योअर होते तेव्हा तुम्ही ती अमाऊंट काढू शकता. तुम्ही दोन वर्षांपर्यंत तुम्ही ही रक्कम काढू शकता नाहीतर तुम्हाला ही रक्कम काढता येत नाही. तुम्हाला चांगली अमांऊट मिळावयाची असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. या गुंतवणूकीतून जर का तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या शाखेला भेट देऊ शकता आणि त्यातून तुम्ही गुंतवमूक करू शकता आणि योग्य ती प्रक्रिया करून या गुंतवणूकीचा फायदा करून घेऊ शकता. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. गुंतवणूकीपुर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)