सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांचं काँग्रेसी कनेक्शन उघड
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांचं काँग्रेसी कनेक्शन उघड झालं आहे. सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणारा अक्षय लाकडा हा एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा दिल्ली विद्यापीठ शाखा अध्यक्ष आहे. त्याने आपल्या ट्विटरवर सावरकरांच्या विटंबनेचं समर्थन केलं आहे. इतकंच नव्हे तर सावरकरांच्या बदनामीला काँग्रेस पक्ष सुद्धा समर्थन करत असल्याचं समोर येतं आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव रूची गुप्ता यांनी अक्षय लाकडाच्या वर्तनाचे समर्थन करणारी भूमिका घेतली आहे. NSUIच्या राष्ट्रीय प्रभारी असलेल्या रुची यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत सावरकर यांना गद्दार असं विशेषण लावत स्वातंत्र्यवीरांची बदनामी केली आहे. समाज माध्यमांवर हे ट्विट व्हायरल होत असून सावरकर प्रेमी त्याविरोधात मोठ्या संख्येने प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, टदिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. यामध्ये दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.' असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 'स्वातंत्र्यासाठी सर्वस्व वेचणाऱ्या सावरकरांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे, असं ही ते म्हणाले. 'कोणीही माथी भडकवून कायदा सुव्यवस्था बिघडवू नये,' असंही त्यांनी म्हटलं.