NTPC Green Energy IPO च्या अलॉटमेंटवर आज शिक्कामोर्तब; अशी करा चेक संपूर्ण प्रोसेस `स्टेप बाय स्टेप`
NTPC Green Energy IPO Allotment: NTPC ग्रीन एनर्जीचा आयपीओ आज येऊ शकतो, पण आयपीओ कसा चेक कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप
NTPC Green Energy IPO Allotment: NTPC ग्रीन एनर्जी आयपीओसाठी तुम्हीदेखील बोली लावली आहे का? तर तुमच्यासाठी आजचा दिवस खास असू शकतो. आज म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी आयपीओचे अलॉटमेंट अंतिम केले जाऊ शकते. IPO ला एकूण 1,43,37,30,852 समभागांसाठी 59,31,67,575 समभागांच्या ऑफरवर बोली प्राप्त झाली आहे. तुम्हाला आयपीओ अलॉट झालाय की नाही तुम्ही या पद्धतीने तपासू शकता.
टी+3 लिस्टिंगचा नियम लक्षात घेऊन एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओचे लिस्टिंग 27 नोव्हेंबर 2024 रोजी होऊ शकते. सब्सक्रिप्शनच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 3.44 पट भरला गेला आहे. हे खूप चांगले संकेत असल्याचे बोलले जात आहे. कारण आयपीओसाठी ग्रे मार्केट प्रिमीयप खूपच कमी होता. फक्त 1 रुपयांच्या GMPसह IPOला अनेकदा इतक्या पटीने बोली मिळत नाही. क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्स (QIBs) कोटा 3.32 पटीने भरला गेला तर नॉन क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्स (QIBs) का कोटा पूर्ण करता आला नाहीये. याला केवळ 81 टक्के सबस्क्रिप्शन मिळालं आहे.
दरम्यान, NTPC ग्रीन एनर्जी ही NTPCची उपकंपनी आहे. जी रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात अग्रणी आहे. ही कंपनी सौर, पवन आणि जलविद्युतसारख्या विविध क्षेत्रातील प्रकल्प विकसित करते. त्याचा IPO 19 नोव्हेंबर 2024 रोजी सुरू झाला आणि 22 नोव्हेंबर रोजी बंद झाला होता. आजा या आयपीओचे अलॉटमेंट सुरू होण्याची शक्यता आहे.
अलॉटमेंट कसा तपासाल?
- तुमच्या फोन किंवा लॅपटॉपमध्ये वेब ब्राउजर सुरू करुन KFin Technologies लिंक करुन kosmic.kfintech.com/ipostatus वर जा
- आता NTPC Green Energy Limited हा पर्याय निवडा नंतर तिथे Application No., Demat Account or PAN यापैकी एक निवडा. एप्लिकेशन नंबर टाकून कॅप्चा टाका आणि सबमिटवर क्लिक करा.
- तुमच्या एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओ अलॉटमेंट स्टेटस तुमच्या फोनवर किंवा कॉम्पुटर स्क्रीनवर दिसणार आहे.
BSE वर असं करा स्टेटस चेक
- सरळ बीएसई लिंकवर लॉगइन कराः bseindia.com/investors/appli_check.aspx;
- इश्यु टाइप पर्यायात Equity पर्याय निवडा
- आता NTPC Green Energy Limited पर्याय निवडा
- तिथे दिलेल्या जागी अॅप्लिकेशन नंबर किंवा पॅन कार्डचे तपशील टाका
- त्यानंतर I'm not a robot वर क्लिक करा आणि नंतर Search पर्यायावर क्विक करा
- त्यानंतर तुमचा एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओची माहिती स्क्रीनवर दिसेल.
IPOची लिस्टिंग 27 नोव्हेंबर रोजी NSE आणि BSE वर होऊ शकते. तर रिफंड प्रक्रिया 24 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि शेअर देखील त्याच दिवशी गुंतवणुकदारांच्या खात्यात जमा होईल. ग्रे मार्केट प्रिमीयम शेअर 111.5 वर ट्रेड होत आहे. आयपीओची इश्यू प्राइज 108 रुपये आहे. हा आयपीओ तीन रुपयांपेक्षा अधिक वर ट्रेड होत आहे. सामान्यतः जास्त GMP वाले आयपीओ लिस्ट वर वाढीव रिटर्न देतात.