मुंबई: कोरोना काळात अनेक नोकऱ्या गेल्या. छोटे उद्योग बंद झाले. अनेकांना घरी बसण्यावाचून पर्याय नव्हता. आता अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी सुरू आहेत.  NTPC मध्ये देखील रिक्त जागांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी वेबसाईटवर जाऊन तिथे अर्ज भरावा लागणार आहे. सरकारी नोकरी करण्याची ही संधी सोडू नका. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लगेचच अर्ज करा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही जर NTPC चा अर्ज भरू इच्छीत असाल तर तुम्हाला नेमकं काय करावं लागणार हे आम्ही सांगणार आहोत. ntpc.co.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथे अर्ज करायचा आहे. तिथे गेल्यावर तुम्ही कोणत्या जागेसाठी अर्ज भरू इच्छीता तो पर्याय निवडायचा आणि तिथे आपले डिटेल्स भरायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर आहे. 


या लिंकवर जाऊन https://open.ntpccareers.net/2021_med_sps/ तुम्ही अधिकृत नोटिफिकेशन देखील मिळवू शकता. मेडिकल स्पेशलिस्ट म्हणून 27 रिक्त पदं तर असिस्टेंट स्पेशलिस्ट/फाइनेंस ऑफिसरच्या 20 पदांसाठी जागा निघाली आहे. मेडिकल स्पेशलिस्टसाठी  37 वर्ष वय असणं आवश्यक आहे. तर असिस्टंट स्पेशलिस्ट/फाइनेंस ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 30 वर्ष असणं आवश्यक आहे. 


मेडिकल स्पेशलिस्ट (सामान्य चिकित्सा)


E4 स्तरावर अर्ज करण्यासाठी- MD/DNB आणि एकवर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
पगार- 70 हजार ते 2 लाख
E3 स्तरावर अर्ज करण्यासाठी- MD/DNB
पगार- 60 हजार ते 1.80 लाख


मेडिकल स्पेशलिस्ट (बाल रोग)


E4 स्तरावर अर्ज करण्यासाठी- MD/DNB आणि एकवर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
पगार- 70 हजार ते 2 लाख
E3 स्तरावर अर्ज करण्यासाठी- MD/DNB, MBBS चाईल्स हेल्थ पीजी डिप्लोमा आणि 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक
पगार- 60 हजार ते 1.80 लाख


असिस्टंट स्पेशलिस्ट/फाइनान्स ऑफिसर


CA किंवा ICW क्वालीफाय असलेला उमेदवार असणं आवश्यक
पगार-  30,000 ते 1.20 लाख