नर्सने माचिस लावताच भडकली आग, झाशी अग्नितांडवाचं खरं कारण आलं समोर; 4 वर्षांपूर्वी एक्सपायर झालेला सिलेंडर
झाशी मेडिकल कॉलेजमध्ये अग्नितांडवाचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खरं कारण. नर्सने केलेल्या त्या एका चुकीमुळे होत्याचं नव्हतं झालं.
उत्तर प्रदेशच्या झाशी येथील मेडिकल कॉलेजमधील चाइल्ड वॉर्डमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा 10 वाजता अचानक आग लागल्याने दुर्दैवी घटना घडली आहे. या दरम्यान 16 मुले गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. असं सांगितलं जात होतं की, शॉक सर्किटमुळे आग लागण्यात आली होती आणि इतकी मोठी दुर्दैवी घटना घडली. पण प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, एका नसर्ने ऑक्सिजन सिलेंडरचे पाईप जोडण्यासाठी माचिसने आग लावली आणि जशी माचिस पेटवली तेव्हा पूर्ण वॉर्डमध्ये आग लागली.
झाशीचे चीफ मेडिकल सुप्रीडेंटेंड यांच्या माहितीनुसार, NICU मध्ये 54 बालके होती. अचानक ऑक्सिजन कंसंट्रेटरमध्ये आग लागल्यामुळे ऑक्सिजनने भरलेले NICU वॉर्डमध्ये आग पसरली. झासी डिविजनच्या DIG यांनी सांगितले की, आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. जखमी झालेल्या मुलांना आता इतर वॉर्डमध्ये शिफ्ट केले आहे. पंतप्रधान योगी यांनी सांगितले की, 12 तासांत रिपोर्ट सादर केला गेला आहे.
प्रत्यक्षदर्शीने सांगितले सत्य
हमीरपुर येथे राहणारे प्रत्यक्षदर्श भगवान दास हे त्या लोकांपैकी आहेत. ज्यांचा नातू हा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमधील रुग्णालयात दाखल केलं होतं. गुरुवारी जेव्हा आग लागली तेव्हा भगवान दास वॉर्डमध्ये उपस्थित होते. सुरुवातीच्या तपासणीत जरी शॉर्ट सर्किट हे कारण सांगितले असेल मात्र भगवान दास या घटनेचे एकटे प्रत्यक्षदर्शी आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाच खरं कारण सांगितले आहे.
भगवान दास यांच्या माहितीनुसार, लहान मुलांच्या वॉर्डमध्ये ऑक्सिजन सिलेंडरला पाइप लावण्यासाठी नर्सने माचिस पेटवली. जशी माचिस पेटवली तशी संपूर्ण वॉर्डमध्ये आग लागली. आग लागताच भगवान दास यांनी आपल्या गळ्यातील कपड्यांमधून 3 ते 4 मुलांना गुंडाळून त्यांचा बचाव केला. इतर लोकांच्या मदतीने मुलांना वाचवण्यात आलं.
एक्सपायर झालेला सिलेंडर
धक्कादायक बाब म्हणजे, आग लागल्यानंतर फायर अलार्म देखील वाजले नाही. तसेच वॉर्डमध्ये ठेवलेले सिलेंडर देखील कोणत्याही कामाचे नव्हते. सिलेंडरवर 2019 ही फिलिंग डेट आणि 2020 ही एक्सपायरी डेट होती. म्हणजे फायर एक्सटिंग्विशरला एक्सपायर होऊन एक वर्ष झालं होतं. तरी देखील ते सिलेंडर तिथेच होते.